तुमच्या खात्यावर दुसऱ्या डिव्हाईसवरून लॉगिन झाले आहे. सुरक्षा कारणास्तव या डिव्हाईसवरून ३ सेकंदांत स्वयंचलित लॉग-आऊट होत आहे...
स्पोर्ट्स दुखापती व आजार उपचार मार्गदर्शक
कारणे: शर्यतीमध्ये अचानक वेग घेतल्यामुळे, सराव कमी असल्यामुळे किंवा शरीरात इलेक्ट्रोलाईट्स (मीठ/कॅल्शियम) कमी पडल्यामुळे स्नायू ताणले जातात.
१. दुखापत झालेल्या स्नायूंवर कोमट पाण्याचा किंवा गरम कपड्याचा हलका शेक द्या.
२. त्यावर पेन-किलर स्प्रे (Iodex / Moov Vet) किंवा आयुर्वेदिक तेल लावून मालिश करा.
३. पिण्याच्या पाण्यातून रोज ५० ग्रॅम इलेक्ट्रोलाईट पावडर व गूळ देणे अनिवार्य आहे.
कारणे: खडकाळ मैदानावर पळताना दगडाचा मार लागणे, खूर वेळेवर न तासणे किंवा गोठ्यात चिखल असल्यामुळे जंतूसंसर्ग होणे.
१. खूर पोटॅशियम परमँगनेट (PP) किंवा कॉपर सल्फेटच्या पाण्याने स्वच्छ धुवा.
२. जखमेवर Himax मलम किंवा अँटीसेप्टिक पावडर भरून पट्टी बांधा.
३. खूर स्वच्छ ठेवून पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करा.
कारणे: कडक उन्हात शर्यत पळाल्यामुळे शरीराचे तापमान १०५°F च्या वर जाते आणि डिहायड्रेशन होते.
१. बैलाला सावलीत बांधा आणि डोक्यावर व संपूर्ण अंगावर थंड पाणी टाका.
२. पिण्यासाठी थंड पाण्यात ORS व ग्लुकोज पावडर मिसळून पाजा.
३. गोठ्यात पंखा किंवा कुलर चालू ठेवा. जास्त त्रास असल्यास डॉक्टरांकडून सलाईन लावून घ्या.
कारणे: अस्वच्छ दूध किंवा जास्त दूध पाजल्यामुळे आणि बॅक्टेरिया संसर्गामुळे पांढरे जुलाब होतात.
१. दूध पाजणे तात्पुरते अर्धे करा आणि ORS इलेक्ट्रोलाईट पाणी पाजा.
२. खोंडाच्या शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका.
३. सौंफ व जिऱ्याचे उकळलेले थंड पाणी ५० मिली पाजल्यास आराम मिळतो.
कारणे: पोटात जंत (Roundworms) वाढल्यामुळे अन्न अंगाला लागत नाही. तसेच सिमेंटच्या फरशीवर बसल्याने गुडघ्यांना सूज येते.
१. जन्मल्यानंतर ७ ते १० दिवसांच्या आत पहिले जंतनाशक औषध (Dewormer) द्या.
२. सांध्यांवर सूज असल्यास गरम शेक द्या आणि गोठ्यात रबर मॅटचा वापर करा.
३. आहारात लिक्विड व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम समाविष्ट करा.